वृत्तसंस्था / डोहा
येथे सुरू असलेल्या आशियाई युवा मुले आणि मुलींच्या वेटलिफ्टींग चॅम्पियनशीप स्पर्धेत भारताची महिला वेटलिफ्टर ज्योत्स्ना सबरने 40 किलो वजन गटात सुवर्ण पदकाला गवसणी घातली. या स्पर्धेत भारताने आतापर्यंत 4 पदके मिळविली आहेत.
मुलींच्या युवा गटातील 40 किलो वजन गटामध्ये ज्योत्स्नाने स्नॅचमध्ये 60 किलो तर क्लिन आणि जर्कमध्ये 75 किलो असे एकूण 135 किलो वजन उचलत नव्या आशियाई विक्रमासह सुवर्णपदक पटकाविले. युवा मुलींच्या गटात भारताच्या पायलने 45 किलो वजन गटात एकूण 155 किलो वजन उचलत सुवर्ण पदक घेतले आहे. त्याच प्रमाणे पायलने कनिष्ठ मुलींच्या 45 किलो वजन गटात कास्यपदक मिळविताना एकूण 155 किलो वजन उचलले आहे. या स्पर्धेच्या पहिल्या दिवशी भारतीय स्पर्धकांना फारसे यश मिळू शकले नाही.









