वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाणाऱ्या भारताच्या कनिष्ठ महिला हॉकी संघाचे नेतृत्व बचावफळीतील ज्योती सिंगकडे सोपविण्यात आले आहे. ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यात भारतीय महिला हॉकी संघ 5 सामन्यांची हॉकी मालिका खेळणार आहे. या दौऱ्यातील ही मालिका 26 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर दरम्यान कॅनबेराच्या नॅशनल हॉकी स्टेडियममध्ये खेळविली जाणार आहे. भारत कनिष्ठ महिला हॉकी संघाचे या मालिकेतील पहिले 3 सामने ऑस्ट्रेलियाच्या कनिष्ट हॉकी संघाबरोबर होणार आहेत. तर उर्वरित दोन सामने कॅनबेरा चील संघाबरोबर खेळवले जातील. या दौऱ्यासाठी 23 सदस्यांचा संघ हॉकी इंडियाने घोषित केला आहे.
भारतीय कनिष्ठ महिला हॉकी संघ – गोलरक्षक : निधी, हर्षाराणी मिंझ, बचावफळी : मनिषा, ज्योती सिंग, ललितानलुंगाई, ममीता ओरम, साक्षी शुक्ला, पूजा साहू, नंदीनी, मध्यफळी : प्रियांका यादव, साक्षी राणा, के. शलिमा चानू, रजनी करकेटा, बिनिमा धन, इशिका, सुनेलिता टोप्पो, अनिशा साहू, आघाडी फळी : लालरिनपुई, निशा मिंझ, पौर्णिमा यादव, सोनम, कनिका सिवाच, सुखवीर कौर.









