दृष्टीहीनांना सक्षम करण्यासाठी विविध क्लबचे योगदान : प्रकल्पाची किंमत 3 लाख 50 हजार
बेळगाव : बेळगाव चॅलेंजर्स टँजेंट क्ष्38 तर्फे बेळगाव-41 ईआरएस क्लब क्ष्125 यांच्यावतीने ज्योती दृश्यम हा राष्ट्रीय उपक्रम यशस्वीपणे पार पडला. दृष्टीहीनांना सक्षम करण्याचा हा उपक्रम होता. 8 एप्रिल रोजी झालेल्या या कार्यक्रमाला बेळगाव राऊंड टेबल क्ष्-119, राऊंड टेबल-237, लेडीज सर्कल-208, बेळगाव रॉयल्स-41 क्लब क्ष्-270 या क्लबचे सहकार्य लाभले. प्रमुख पाहुणे म्हणून 41 चे अध्यक्ष दिलीप चांडक, राऊंड टेबलचे सुदर्शन जाधव, लेडीज सर्कलच्या श्रेया सुंठणकर आदी उपस्थित होते. यावेळी 15 ते 20 वयोगटातील 25 जणांना ज्योती एआय चष्मा देण्यात आला. दृष्टीहीनांना त्यांच्या सभोवतालच्या परिसरात वावरताना, दैनंदिन कामे करताना आणि आत्मविश्वासाने जगण्यास मदत करण्यासाठी हे स्मार्ट उपकरण तयार करण्यात आले आहे. या प्रकल्पाची किंमत 3 लाख 50 हजार असून ती सर्व क्लबच्या योगदानामुळे आणि बेळगाव-41 क्लबचे हरिश गुलाबानी यांच्या विशेष सहकार्यामुळे पूर्ण झाली. याप्रसंगी क्लबचे पदाधिकारी उपस्थित होते.









