स्पर्धेत सर्वसाधारण विजेतेपद, अनेक खेळाडू चमकले : महिला गटात स्नेहा भोसले प्रथम
बेळगाव : विश्व भारती कला क्रीडा प्रतिष्ठान आयोजित कारगिल मॅरेथॉन स्पर्धेत ज्योती स्पोर्ट्स क्लबच्या खेळाडूंनी घवघवीत यश संपादन करीत सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. या स्पर्धेत 42.195 कि. मी. मॅरेथॉन स्पर्धेत महिला गटात स्नेहा भोसलेने प्रथम, प्राजक्ता मरगाळने द्वितीय, 21 कि. मी. धावण्याच्या स्पर्धेत आकांक्षा गणेबैलकरने प्रथम, मीनाक्षी कुरबर हिने दुसरा क्रमांक पटकाविला. तर पुरुष गटात 21 कि. मी. धावण्याच्या स्पर्धेत 56 वर्षाच्या कल्लाप्पा तीरवीर यांनी पाचवा क्रमांक, 10 कि. मी. धावण्याच्या पुरुष गटात भूषण गुरव याने द्वितीय क्रमांक पटकाविला आहे. विश्व भारती कला क्रीडा संघटनेतर्फे विजेत्या सर्व खेळाडूंचा खास सत्कार करण्यात आला. या स्पर्धेत ज्योती स्पोर्ट्स क्लबला सर्वसाधारण विजेतेपद देऊन गौरव करण्यात आला. वरील खेळाडूंना प्रशिक्षक लक्ष्मण कोलेकर, अनिल गोरे यांचे बहुमुल्य मार्गदर्शन तर सतीश पाटील, सचिन नाईक व माधवी कोलेकर यांचे प्रोत्साहन लाभले. या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.









