वृत्तसंस्था/नवी दिल्ली
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश के. व्ही. विश्वनाथन यांनी गुरुवारी कोळसा घोटाळा खटल्यांच्या सुनावणीपासून स्वत:हून माघार घेतली. सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्या अध्यक्षतेखालील या खंडपीठात न्यायमूर्ती विश्वनाथन आणि न्यायमूर्ती संजय कुमार यांचा समावेश होता. आता 10 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या आठवड्यात खटल्यांची सुनावणी करण्यासाठी तीन न्यायाधीशांच्या नवीन खंडपीठाची पुनर्रचना करतील असे सरन्यायाधीशांनी सांगितले. 2014 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने 1993 ते 2010 दरम्यान केंद्राने वाटप केलेले 214 कोळसा खाणी रद्द केल्या होत्या. तसेच विशेष सीबीआय न्यायाधीशांमार्फत खटला चालवण्याचे आदेश दिले होते.









