नवी दिल्ली : न्यायमुर्ती डीवाय चंद्रचुड (D.Y. Chandrachud) यांची सोमवारी भारताचे 50 वे सरन्यायाधिश (CJI) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. याबद्दलची माहीती केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू (Kiren Rijeju )यांनी दिली आहे. विद्यमान सरन्यायाधिश उमेश लळित ( U.U.Lalit) वयाच्या 65व्या वर्षी निवृत्त होत आहेत. सरन्यायाधिश लळीत यांनी पद सोडल्यानंतर 9 नोव्हेंबर रोजी न्यायमुर्ती चंद्रचूड हे शपथ घेतील.
आपल्या ट्वीट मध्ये लिहताना मंत्री किरेन रिजेजू म्हणाले, “भारतीय राज्यघटनेने दिलेल्या अधिकाराचा वापर करून माननीय राष्ट्रपतींनी डॉ. न्यायमुर्ती चंद्रचूड सिंग यांची सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधिश पदी निवड केली गेली आहे.”
न्यायमुर्ती डिवाय चंद्रचूड यांचे वडिल वायव्ही चंद्रचूड हेसुद्धा भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्य़ायाधिश होते.
न्यायमुर्ती चंद्रचूड 10 नोव्हेंबर 2024 रोजी निवृत्त होतील.