चेन्नई : तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जे. जयललिता यांचा २०१६ मध्ये मृत्यु झाला. सलग ७५ दिवस जयललिता यांना हॉस्पीटलमध्ये उपचार सुरू असताना त्यांच्या तब्येतीची माहीती गुपित ठेवली गेली असा आरोप त्यांचा निकटवर्तीय शशीकला यांच्यावर केला जात आहे. जयललितांच्या मृत्यूच्या परिस्थितीची चौकशी करण्यासाठी न्यायमूर्ती अरुमुघस्वामी आयोग स्थापन केला गेला होता. हा अहवाल तामिळनाडूच्या विधानसभेत उगड करण्यात आला आहे.
या आयोगाने माजी AIADMK प्रमुख आणि तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या मृत्युबद्दलचे अनेक पैलू समोर आणले आहेत. जयललिता रुग्णालयातील 75 दिवसांचा मुक्काम गूढरित्या लपवला गेला होता. त्यामुळे त्यांच्या मृत्यूबद्दल कट किंवा करास्थान असण्याच्या शंकेला वाव आहे असे अहवालाला म्हटले आहे.
चौकशी अहवालात, न्यायमूर्ती अरुमुघस्वामी आयोगाने तज्ञांच्या शिफारशीनंतरही तिला उपचारासाठी परदेशात नेले जात नाही अशी त्रुटी दाखवली आहे. जयललिता यांच्या हृदयात छिद्र होते. एम्सच्या तज्ज्ञांनी आणि यूकेमधील डॉ. रिचर्ड बील यांनी अँजिओग्रामसह इतर उपचार परदेशात करण्याची शिफारस केली होती. जयललिता यांना चेन्नईच्या अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात 75 दिवस असलेल्या जयललिता यांच्यावर केलेल्या उपचारावर देखिल शंका घेतल्या जात आहेत. जयललिता यांना उपचारादरम्यान भक्तीगीते ऐकवण्यात आली. तसेच त्यांच्या आवडत्या देव-देवतांच्या प्रतिमा त्यांच्या आवतीभोवती ठेवण्यात आल्या होत्या. त्यांच्या शेजारी त्यांच्या आवडीची हिरवी झाडे ठेवण्यात आली होती.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









