दिल्ली : दिल्ली पोलिसांनी “भारतातील सर्वात मोठा कार चोर” ठरलेल्या अनिल चौहानला अटक केली आहे. अनिल चौहानने आतापर्यंत ५००० पेक्षा जास्त चारचाकी गाड्या चोरल्या असून तो वाहने चोरणाऱ्या टोळीचा प्रमुख आहे. तो दिल्लीत आल्याची माहिती पोलिसांना मिळताच त्याला अटक करण्यात आली. पोलिसांनी त्याच्याकडून सहा देशी बनावटीचे पिस्तूल, सात जिवंत काडतुसे, एक चोरीची मोटारसायकल आणि एक चोरीची कार जप्त केली.
अनिल चौहान ( वय ५२) हा दिल्लीतील रहिवासी असून तो मुळचा आसाममधील तेजपूरचा आहेत. तो १९९८ पासून वाहने चोरत असून भारताच्या विविध भागातून त्याने ५००० हून अधिक वाहने चोरली आहेत. त्याच्यावर आसाममध्ये गेंड्याच्या शिंगांच्या तस्करीचा ही गुन्हा नोंद असून अवैध शस्त्रास्त्रांच्या पुरवठ्यातही त्याचा सक्रिय सहभाग असल्याचे पोलिसांनी सांगितले. निजामुद्दीन पोलिस ठाण्यात एका फौजदारी खटल्यात त्याला पाच वर्षांची शिक्षा झाली होती असे पोलिस उपायुक्त श्वेता चौहान यांनी सांगितले.
अनिल चौहान हे आसाम सरकारचा वर्ग-1 चा कंत्राटदार होता. त्यानंतर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) त्याच्या ऑफिसवर छापा टाकून त्याची सर्व मालमत्ता जप्त केली. त्यानंतर बँकेने त्याच्या सर्व मालमत्तेचा लिलाव केला.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









