वृत्तसंस्था/ मुंबई
ज्युपिटर हॉस्पिटलचा आयपीओ लवकरच भांडवली बाजारात येणार असून त्या संदर्भातली प्राईस बँड कंपनीने निश्चित केली आहे. ज्युपिटर लाईफलाईन हॉस्पिटल यांचा आयपीओ 6 सप्टेंबरला बाजारात खुला होणार आहे.
आयपीओच्या माध्यमातून 869 कोटी रुपये उभारण्याची योजना कंपनीची आहे. आयपीओसाठी ज्युपिटर लाईफलाईन हॉस्पिटलने 695 ते 735 रुपये प्रति समभाग इतका दर निश्चित केला आहे. आयपीओअंतर्गत 20 इक्विटी समभागांचा लॉट निश्चित केला आहे, ज्यामध्ये गुंतवणूकदारांना गुंतवणूक करता येईल.
समभागांची होणार विक्री
ऑफर फॉर सेल अंतर्गत देवांग गांधी 12.5 लाख इक्विटी समभाग विक्री करणार आहेत. नीता गांधी या देवांग यांच्यासोबत नऊ लाख सभभाग सादर करणार आहेत. कंपनीने आयपीओकरता मे च्या सुरुवातीला आपली कागदपत्रे जमा केली होती.
कधी होणार खुला
कंपनीचा आयपीओ 6 ते 8 सप्टेंबर या कालावधीमध्ये सबक्रीप्शनसाठी खुला होणार आहे. आयपीओअंतर्गत समभागांचे अलॉटमेंट 13 सप्टेंबरला होणार आहे. आयपीओचे लिस्टिंग 18 सप्टेंबरला होण्याची शक्यता सांगितली जात आहे.









