वृत्तसंस्था / नवी दिल्ली
जॉर्डनमधील अमान येथे 17 एप्रिल ते 1 मे दरम्यान होणाऱ्या 15 आणि 17 वर्षांखालील वयोगटातील पुरुष आणि महिलांच्या कनिष्ट मुष्टीयुद्ध स्पर्धेसाठी भारताचा 56 जणांचा संघ सहभागी होणार आहे.
मुलांच्या 17 वर्षांखालील वयोगटामध्ये साहील दुहान, दिवेनेश, टिकाम सिंग यांचा समावेश आहे. तर मुलींच्या गटामध्ये समिक्षा सिंग, अनसिका, खुषी चंद यांना संधी देण्यात आली आहे. विश्व मुष्टीयुद्ध फेडरेशनतर्फे नियुक्त केलेल्या हंगामी भारतीय निवड समितीने यास्पर्धेसाठी संघांची निवड केली आहे. या स्पर्धेतील प्राथमिक फेरीतील लढतींना शनिवारपासून प्रारंभ होत आहे.









