वृत्तसंस्था/नवी दिल्ली
पुढील आठवड्यामध्ये 10 डिसेंबरला जंगल कॅम्प्स इंडिया यांचा आयपीओ गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. 12 डिसेंबरपर्यंत या आयपीओमध्ये गुंतवणूक करता येणार आहे. कंपनी वाईड लाईफ आणि कंझरव्हेशनसंदर्भातील क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. 40 लाख 86 हजार 400 ताजे इक्विटी समभाग कंपनी सादर करणार आहे. 35 टक्के रिटेल गुंतवणूकदारांसाठी 50 टक्के संस्थात्मक गुंतवणुकदारांसाठी आणि 15 टक्के बिगर संस्थांत्मक गुंतवणूकदारांसाठी आयपीओ राखीव राहणार आहे. या आयपीओच्या माध्यमातून 29 कोटी रुपये कंपनीला उभारहायचे असून समाभागाची ईशु किंमत 72 इतकी ठेवण्यात आली आहे. पर्यटनाच्या बाबतीमध्ये कंपनी विस्तारासाठी प्रयत्न करणार असून आयपीओतून उभारण्यात आलेल्या रकमेपैकी 7 कोटी रुपयांचा खर्च संजय डुबरी नॅशनल पार्कमधील नव्या प्रकल्पाच्या विकासासाठी केला जाणार आहे. त्याच प्रमाणे मध्यप्रदेशमध्ये स्वत:च्या रिसॉर्ल्टच्या विकासासाठी देखील कंपनी 3.5 कोटी खर्च्ज करणार आहे. उत्तरप्रदेशमध्ये मथुरामध्ये एका फोरस्टार हॉटेलच्या विकासासाठी पैसे खर्च करणार आहे. इतर रक्कमेचा वापर इतर खर्चांसाठी केला जाणार आहे.









