इस्लामाबाद / वृत्तसंस्था
पाकिस्तानमध्ये चलनवाढीचा दर 25 टक्क्मयांवर पोहोचला आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या महागाईमुळे लोक सैरभैर झाले असतानाच एका ठिकाणी स्वस्त दरात पीठ-आटय़ाचे वाटप सुरू असल्याची माहिती मिळताच तेथे झुंबड उडाली. स्वस्त आटय़ासाठी लोकांनी गर्दी केल्यामुळे चेंगराचेंगरी होऊन चौघांना प्राण गमवावे लागले. सिंधमधील मीरपूर खास जिह्यात अन्न विभागाकडून आटा पाकिटांचे वाटप सुरू असताना ही दुर्घटना घडली आहे. ट्रकमधून आणलेली आटय़ाची पाकिटे पाहून गर्दी जमल्यानंतर चेंगराचेंगरीत अनेक जण जखमी झाले आहेत. एका 35 वषीय इसमाचा जागीच मृत्यू झाला. तर, बेनझीराबाद जिह्यातील सकरंद शहरात तीन महिलांचा मृत्यू झाला.









