बाबिल खान देखील मुख्य भूमिकेत
बाबिल खान ‘कलां’ चित्रपटानंतर आता लवकरच नव्या चित्रपटात दिसून येणार आहे. या चित्रपटात तो जूही चावलासोबत झळकणार आहे. या चित्रपटाचे नाव ‘फ्राइडे नाइट प्लान’ असून तो नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला असून तो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
फ्राइडे नाइट प्लानमध्ये जूही चावला आणि बाबिल हे आई अन् मुलाच्या भूमिकेत दिसून येतील. याचबरोबर अमृत जयान यात बाबिलच्या भावाची भूमिका साकारत आहे. टीझरमध्ये जूहीची व्यक्तिरेखा एका दिवसासाठी घरातून बाहेर जात असल्याचे आणि त्यानंतर तिची दोन्ही मुले घरात पार्टी करत असल्याचे दाखविण्यात आले आहे.

नेटफ्लिक्सच्या फ्राइडे नाइट प्लान चित्रपटाची निर्मिती फरहान अख्तर आणि रितेश सिधवानी यांच्या एक्सेल एंटरटेन्मेंटने केली आहे. तर चित्रपटाचे दिग्दर्शन वत्सल नीलकंठ यांनी केले आहे. हा चित्रपट 1 सप्टेंबर रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित केला जाणार आहे.
बाबिल यापूर्वी ‘कलां’ या चित्रपटात दिसून आला होता. या चित्रपटातील अभिनयासाठी त्याचे कौतुक झाले होते. बाबिल हा दिवंगत अभिनेते इरफान खान यांचा पुत्र आहे. तर जूही चावला यापूर्वी हश हश या सीरिजमध्ये दिसून आली होती.









