वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताचा पुरुष ज्युडोपटू जसलिनसिंग सैनी उत्तेजक चाचणीत दोषी आढळल्याचे सांगण्यात आले. गेल्या महिन्यात झालेल्या तैपेई खुल्या ज्युडो स्पर्धेत सैनीने आपला सहभाग दर्शवून पुरुषांच्या 66 किलो वजनगटात सुवर्णपदक मिळवले होते.
तैपेईतील झालेल्या स्पर्धेनंतर सैनीची उत्तेजक चाचणी घेण्यात झाली त्याच्या मूत्रल नम्युनामध्ये निर्बंध घातलेले द्रव आढळल्याचे सांगण्यात आले. आता 25 वर्षी सैनीला तैपेई खुल्या ज्युडो स्पर्धेत मिळवलेले सुवर्णपदक परत करावे लागणार आहे. 23 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर दरम्यान हेंगझोयू येथे होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल संभाव्य संघामध्ये त्याचा समावेश करण्यात आला होता. पण उत्तेजक चाचणीत तो दोषी ठरल्याने त्याचा आशियाई स्पर्धेसाठी संघात समावेश केला जाणार नाही असे या संघाच्या प्रशिक्षकांनी स्पष्टीकरण दिले आहे. गेल्या दोन महिन्यांच्या कालावधीत उत्तेजक चाचणीत दोषी ठरणारा सैनी हात पाचवा ज्युडोपटू आहे. यापूर्वी हर्षदीप ब्रार, गुलाब अली मोहसिन, राहुल सिव्हेटा आणि अक्षय हे चार ज्युडोपटू उत्तेजक चाचणीत दोषी आढळले होते. या सर्व ज्युडोपटूंवर हंगामी स्वरुपाची निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.









