नवी दिल्ली :
स्टील उद्योगातील दिग्गज कंपनी जेएसडब्ल्यू स्टीलचा जूनला संपलेल्या तिमाहीमध्ये निव्वळ नफा 189.3 टक्क्यांनी वधारुन 2,428 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. जो मागील वर्षातील समान तिमाहीमध्ये 839 कोटी रुपये होता.
याच कालावधीमध्ये कंपनीचा महसूल मागील वर्षामध्ये जो 38,086 कोटी रुपये होता त्या तुलनेत यंदा 10.3 टक्क्यांनी वधारुन 42,213 कोटी रुपये झाला आहे. कंपनीचे अध्यक्ष सज्जन जिंदाल यांनी सांगितले, की कंपनी आगामी तीन वर्षांमध्ये आपली क्षमता जवळपास दुप्पट करुन 50 दशलक्ष टनचे ध्येय प्राप्त करणार असल्याची माहिती जिंदाल यांनी दिली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत पोलाद उत्पादनात 11 टक्के वर्षाच्या आधारे वृद्धीसोबत 6.43 मेट्रिक टन वृद्धी नोंदवली आहे. जेएसडब्ल्यू स्टील कॅनडामध्ये कोळसा व्यवसायामध्ये 20 टक्क्यांच्या वाट्यासाठी बोली लावणार आहे.









