11 ऑगस्टपर्यंत गुंतवण्याची संधी : 3600 कोटी उभारणार
वृत्तसंस्था/मुंबई
सज्जन जिंदाल यांच्या नेतृत्वाखालील जेएसडब्ल्यू ग्रुपमधील कंपनी जेएसडब्ल्यू सिमेंटने गुरुवारी प्रारंभिक सार्वजनिक ऑफरिंग (आयपीओ) गुंतवणूकीसाठी खुला केला. जेएसडब्ल्यू सिमेंटच्या आयपीओची किंमत प्रति शेअर 139 ते 147 रुपये आहे. कंपनी आयपीओमधून सुमारे 3,600 कोटी रुपये उभारण्याची योजना आखत आहे. जेएडब्ल्यू सिमेंटचा आयपीओ सोमवार (11 ऑगस्ट) पर्यंत अर्ज करण्यासाठी खुला राहणार आहे. आयपीओ अंतर्गत, 1,600 कोटी रुपयांचे नवीन शेअर्स जारी केले जाणार आहेत. यामध्ये 2000 कोटी रुपयांचा ऑफर फॉर सेल देखील राहणार आहे. जेएसडब्ल्यू सिमेंटचा आयपीओ गुरुवार, 7 ऑगस्ट 2025 रोजी सार्वजनिक ऑफरिंगसाठी खुला होईल आणि सोमवार, 11 ऑगस्ट 2025 रोजी बंद होईल. अँकर गुंतवणूकदारांसाठी बोली प्रक्रिया बुधवार, 6 ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आली होती.
आयपीओ लॉट्स
गुंतवणूकदार आयपीओमध्ये किमान 102 शेअर्ससाठी बोली लावू शकतात. 147 रुपयांच्या कमाल किमतीवर आधारित, किमान गुंतवणूक रक्कम 14,994 रुपये होते.
किंमत बँड
139 ते 147-इश्यू आकार
3,600 कोटी-(वरच्या बँडवर)
ताजा इश्यू-1,600 कोटी
विक्रीसाठी ऑफर-2,000 कोटी
लॉट आकार-102 शेअर्स राहणार









