समाजाला दिशा देण्याच्या कार्यात डिचोलीतील पत्रकारांचे मोठे योगदान. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे प्रतिपादन. डिचोलीत पत्रकार कक्षाचे उदघाटन. डिचोलीतील पत्रकारांचे स्वप्न साकार.
डिचोली/प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या डिचोली तालुक्मयाला मोठा इतिहास असून राज्यात धर्मांतरण होत असताना स्वदेश, स्वभाषा व स्वसंस्कृती अबाधितपणे राखून ठेवण्याच्या कार्यात या तालुक्मयाने मोठी भूमिका वठवली आहे. आपली हि सांस्कृतिक चळवळ पुढे नेण्याचे कार्य आजचे पत्रकार करीत असून कोणतेही बदल व परिवर्तन घडविण्यासाठी पत्रकारांची मोठी भुमिका असते. समाजाला योग्य दिशा देण्यचे कार्य पत्रकार करीत असतात आणि त्यात डिचोलीतील पत्रकारांचे मोठे योगदान आहे. असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी डिचोली येथे आयोजित पत्रकार कक्षाच्या उदघाटन सोहळय़ात केले.
डिचोली पत्रकार संघाला अधिकृतपणे देण्यात आलेल्या पत्रकार कक्षाचा उदघाटन सोहळा डिचोली शहरातील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या इमारतीत पार पडला. यावेळी व्यासपीठावर डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेटय़?, मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट, डिचोलीचे नगराध्यक्ष कुंदन फळारी, माजी सभापती राजेश पाटणेकर, डिचोली पत्रकार संघाचे अध्यक्ष रविराज च्यारी यांची उपस्थिती होती.
पत्रकारीता हा व्यवसाय नसून नवीन पिढी या क्षेत्रात येत नाही. समाजात भविष्यात पत्रकार आणि साहित्य क्षेत्रातील लेखक निर्माण व्हावे यासाठी पत्रकारांनीच चळवळ उभी करावी लागणार आहे. आजची पिढी हि वाचन, लेखनापेक्षा ऐकण्यावर जास्त भर देते. या पिढीला वाचन व लेखनची गोडी लागावी यासाठी पत्रकारांनी कार्य करावे लागणार आहे. डिचोलीतील पत्रकारांना राज्यातील प्रथम अधिकृतपणे “पत्रकार कक्ष” प्राप्त झाला असून इतरही तालुक्मयात अशा प्रकारे पत्रकार कक्ष मिळवून देण्यासाठी सरकार प्रयत्नशील असेल, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी पुढे म्हटले.
पत्रकारांची काळजी सरकार घेते. त्यासाठीच पत्रकारांवर होणाऱया हल्ल्यांविरोधात आरोपींना कडक शिक्षा व्हावी यासाठी सरकारने कायद्यात बदल केला आहे. पत्रकारांसाठी असलेल्या योजनांसाठी ग्रामीण भागातील पत्रकार पात्र ठरत नसल्याची कल्पना आपल्यालाही आहे. पत्रकार हे निस्वार्थी भावनेने या राज्यासाठी काम करीत असतात म्हणून या पत्रकारांची काळजी घेणे सरकारचे कर्तव्य आहे. येणाऱया काळात ग्रामीण भागातील पत्रकारांना सरकारी योजनांचा लाभ मिळावा यासाठी योग्य योजना तयार केली जाणार आहे, असेही यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी म्हटले.
यावेळी डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेटय़? यांनी, पत्रकारांकडून शहरी किंवा ग्रामीण भागातून प्रसिद्ध होणाऱया बातम्यांमुळे आज राज्याच्या विकासात भर पडत आहे. राज्यात दर्जेदार पत्रकार निर्माण व्हावे यासाठी सरकारने पत्रकारांना मदतीचा हात देण्याची गरज आहे. कोणत्याही अपेक्षेविना समाजात वावरणाऱया पत्रकारांना दैनंदिन जिवनात अनेक समस्या असतात. तसेच निवृत्तीनंतर या पत्रकारांचे जिवन काय ? हि चिंता त्यांना असते. यासाठी सरकारकडून पत्रकारांसाठी योजना येणे व त्याचा लाभ सर्व ग्रामीण भागातील पत्रकारांना मिळणे आवश्यक आहे, असे म्हटले.
समाजाला दिशा देताना विविध विषयांना वाचा फोडण्याचे कार्य हे पत्रकारांकडून घडत असते. त्यांच्याकडून होणाऱया कार्याचा आम्ही अभिमान बाळगणे महत्वाचे असून पत्रकार हा घटक समाजात अतिमहत्त्वाचा आहे. डिचोलीतील पत्रकारांचे कार्य हे योग्य पध्दतीने चालू असून समाजात जागृती घडविण्याचे कार्य पत्रकारांनी आजपर्यंत केले आहे. त्यांना त्यांच्या मानाचे स्थान मिळणे हि आनंदाची बाब आहे. असे यावेळी मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट यांनी म्हटले.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते जे÷ पत्रकार स्व. औदुंबर च्यारी यांचा मरणोत्तर सत्कार करण्यात आला. आकांक्षा च्यारी यांनी सदर सत्कार स्विकारला. तसेच जे÷ पत्रकार रामनाथ देसाई, विशांत वझे यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. लोकमान्य टिळक यांची प्रतिमा साकारणारे कलाकार साईल संदीप पेडणेकर यांचाही यावेळी मुख्यमंत्र्यांनी गौरव केला. नगराध्यक्ष कुंदन फळारी, माजी सभापती राजेश पाटणेकर यांनीही विचार मांडले. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते फित कापून, कोनशिला अनावरण करून व समई प्रज्वलित करून पत्रकार कक्षाचे उदघाटन करण्यात आले. स्वागत संघाचे अध्यक्ष रविराज च्यारी यांनी केले. तर दुर्गादास गर्दे यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.









