Journalist Vijay Chormare today in Korgaonkar lecture series
श्रीराम वाचन मंदिर आणि क्रीडा भुवन सावंतवाडी यांच्यावतीने देशभक्त प्रभाकरपंत कोरगावकर व्याख्यानमाला अंतर्गत गुरुवार १९ जानेवारीला अभिव्यक्ती के खतरे या विषयावर कोल्हापूर येथील ज्येष्ठ संपादक विजय चोरमारे यांचे व्याख्यान होणार आहे. अध्यक्षस्थस्थानी प्रा. अनिल फराकटे आहेत. व्याख्यान सायंकाळी सहा वाजता सुरू होईल. या व्याख्यानमालेचा लाभ घेण्याचे आवाहन वाचन मंदिरचे अध्यक्ष प्रसाद पावसकर, कार्याध्यक्ष संदीप निंबाळकर, सचिव रमेश बोंद्रे यांनी केले आहे.
सावंतवाडी : प्रतिनिधी









