प्रतिनिधी,रत्नागिरी
राजापुरातील पत्रकार शशिकांत वारीशे यांच्या खूनाचा आरोप असलेला संशयित आरोपी पंढरीनाथ विद्याधर आंबेरकर याच्या जामीन अर्जावर आज सत्र न्यायालयापुढे सुनावणी होणार आहे. रत्नागिरी अतिरिक्त सत्र न्यायाधीश एल. डी. बिले यांच्या न्यायालयात ही सुनावणी होणार आहे. पत्रकाराच्या खूनामुळे गाजलेल्या या प्रकरणाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई-गोवा महामार्गावरील कोदवली पेट्रोल पंपासमोरील रस्त्यावर 6 फेबुवारी 2023 रोजी राजापुरातील पत्रकार शशिकांत वारीशे यांचा थार गाडीखाली चिरडून मृत्यू झाला होता. पोलीस तपासात हा पूर्वनियोजित खून असल्याचे समोर आले. त्यानुसार पेलिसांनी पंढरीनाथ आंबेरकर याच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला. तसेच पंढरीनाथ याला अटक करण्यात आली. सध्या न्यायालयात कोठडीत असलेल्या पंढरीनाथ याने जामीन मिळवण्यासाठी अर्ज दाखल केला आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









