दिवंगत मुलीला मिळवून दिला होता न्याय
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
टीव्ही पत्रकार सौम्या विश्वनाथन यांचे वडिल एम.के. विश्वनाथन यांचे निधन झाले आहे. सौम्या विश्वनाथन यांची सप्टेंबर 2008 मध्ये रात्री कामावरुन परतत असताना राष्ट्रीय राजधानीत हत्या करण्यात आली होती. मुलगी सौम्याच्या मारेकऱ्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेल्या दोन आठवड्यांनीच तिच्या पित्याचे निधन झाले आहे. 82 वर्षीय एम.के. विश्वनाथन यांनी स्वत:च्या मुलीच्या 41 व्या जन्मदिनाच्या एक दिवस आधी अखेरचा श्वास घेतला आहे.
सौम्याच्या मारेकऱ्यांना 25 नोव्हेंबर रोजी दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. रवि, अमित, बलजीत आणि अजय यांना जन्मठेप तर पाचवा गुन्हेगार अजय सेठी याला तीन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. या सर्वांना मकोका तरतुदींच्या अंतर्गत संघटित गुन्हेगारीसाठी दोषी ठरविण्यात आले होते.









