करमाळा प्रतिनिधी-
करमाळा येथील स्वातंत्र्यसैनिक कै.साथी मनोहरपंत चिवटे यांच्या स्मरणार्थ आरोग्य क्षेत्रात जनजागृती पर लिखाण करणाऱ्या पत्रकारांना देण्यात येत असलेला यावर्षीचा मानाचा पुरस्कार संदीप आचार्य यांना देण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मराठी पत्रकार परिषदेच्या पिंपरी चिंचवड येथे आयोजित अधिवेशनात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. मानचिन्ह, शाल, श्रीफळ व 25000 रुपयांचा धनादेश या पुरस्काराचे स्वरूप होते.
यावेळी व्यासपीठावर खासदार श्रीरंग बारणे,आमदार महेश लांडगे,आमदार रोहित दादा पवार,आमदार आदिती तटकरे,इलेक्ट्रॉनिक मीडियाचे अध्यक्ष विनोद जगदाळे,मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष एस. एम. देशमुख ,पत्रकार रवी आंबेकर ,समीर वावळणेकर आदीसह पत्रकार क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
संदीप आचार्य हे दैनिक लोकसत्तामधून सातत्याने आरोग्य विषयक लेखन करून जनजागृती करत आहेत. त्यांनी निर्माण केलेले आणि अनेक प्रकल्प आरोग्य खात्याने स्वीकारलेले आहेत. महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचावी म्हणून त्यांनी केलेला रोड मॅप महाराष्ट्र शासनाने स्वीकारला आहे. या सर्व त्यांच्या कामाची दखल घेऊन मराठी पत्रकार परिषद महाराष्ट्र राज्य यांनी त्यांची या पुरस्कारासाठी निवड केली आहे.
मराठी पत्रकार परिषदेचे जेष्ठ सदस्य श्री नरसिंह (अप्पा)चिवटे आणि करमाळा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष महेश चिवटे यांनी मराठी पत्रकार परिषदेला दिलेल्या निधीतून हा पुरस्कार दिला असल्याची माहिती अध्यक्ष शरद पाबळे आणि किरण नाईक यांनी दिली. यापुढे आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय पत्रकारिता करणाऱ्या एका पत्रकाराला दरवर्षी हा पुरस्कार दिला जाणार आहे.
यावेळीबोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, संदीप आचार्य यांना गेली मी तीस-पस्तीस वर्षापासून ओळखत असून त्यांनी आरोग्य क्षेत्रात आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून जनजागृतीचे मोठे काम केले आहे.आज मराठी पत्रकार परिषदेने आरोग्य विषयावर लिखाण करणाऱ्यांना पुरस्कार देणे हा उपक्रम अत्यंत कौतुकास्पद आहे.यावेळी वैद्यकीय सहाय्यता मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांनी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीची माहिती विस्तृत दिली.
पुरस्कार प्राप्त पत्रकार संदीप आचार्य म्हणाले, आरोग्य क्षेत्रातील लिखाण अत्यंत महत्त्वाचे असून या लिखाणामुळे सर्वसामान्य अडचणीत असणाऱ्या रुग्णाला योग्य मार्गदर्शन सल्ला व मदत मिळते.आजचा पुरस्कार खऱ्या अर्थाने रुग्णांसाठी जे संवेदनशील म्हणून ओळखले जातात अशा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मला हा पुरस्कार मिळाला, यामुळे या पुरस्काराचा मला अभिमान आहे अशी प्रतिक्रिया दिली.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









