सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे जेष्ठ सदस्य लक्ष्मण उर्फ बबन गवस (६९) यांचे डोंगरपाल ता.सावंतवाडी येथील निवासस्थानी शुक्रवारी सायंकाळी ०८.०५ वाजताच्या सुमारास दुःखद निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर डोंगरपाल येथील स्मशानभूमीत शनिवार १२ ऑक्टोबरला सकाळी ९ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.”बबन” या टोपण नावाने सर्वजण त्यांना ओळखत, उत्कृष्ट कबड्डीपटू, खोखो खेळाडू म्हणून त्यांनी राज्यात नाव ,लौकिक मिळविला होता. महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री ना . दीपक केसरकर यांचे ते स्वीय सचिव होते.त्यांच्या पश्चात भाऊ, वहिनी,पुतणे पुतणी असा मोठा परिवार आहे. दैनिक तरुण भारत मध्ये त्यांनी काम केले होते .राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी त्याचे निकटचे संबंध होते. मुंबई मंत्रालयात त्यांचा वरिष्ठ सचिव पातळीवरील अधिकाऱ्यांशी संवाद होता.
Previous Articleवेंगा फिटनेस फायटर्सचे नवरात्री ‘नाईन X नाईन’ रन मिशन
Next Article आजचे भविष्य शनिवार दि. 12 ऑक्टोबर 2024









