Journalist Amey Tirodkar in Korgaonkar lecture series today
श्रीराम वाचन मंदिर आणि क्रीडा भुवन सावंतवाडी यांच्यावतीने देशभक्त प्रभाकरपंत कोरगावकर व्याख्यानमाला अंतर्गत बुधवार १८ जानेवारीला ‘माध्यमांनी भारतीय लोकशाहीसमोर उभे केलेले आव्हान’ या विषयावर मुंबई येथील ज्येष्ठ पत्रकार अमेय तिरोडकर यांचे व्याख्यान होणार आहे. तिरोडकर यानी ‘महानगर’पासून आपल्या पत्रकारितेला प्रारंभ केला. आयबीएन लोकमत वाहिनीचे दिल्ली प्रतिनिधी म्हणून त्यांनी काम पाहिले. सध्या वेब पोर्टलवर फ़्रीलान्स म्हणून ते कार्यरत आहेत. साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष आणि राष्ट्रसेवा दलाचे कार्यकर्ते म्हणूनही ते कार्यरत आहेत.
अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार विजय शेट्टी आहेत. या व्याख्यानमालेचा लाभ घेण्याचे आवाहन वाचन मंदिरचे अध्यक्ष प्रसाद पावसकर, कार्याध्यक्ष संदीप निंबाळकर, सचिव रमेश बोंद्रे यांनी केले आहे.
सावंतवाडी : प्रतिनिधी









