कोल्हापूरः
महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश सह देशातील लाखो भावीकांचे श्रद्धास्थान असलेल्या दख्खनचा राजा श्री जोतिबाच्या मूर्तीवरील रासायनिक संवर्धन प्रक्रिया पूर्ण झाली आहे. २१ जानेवारीपासून ४ दिवस मूर्तीवर रासायनिक संवर्धन प्रक्रिया सुरू होती.
भारतीय पुरातत्त्व विभागाच्या तज्ञांकडून हे काम करण्यात आलं. काल शुक्रवार २४ जानेवारी रोजी या संवर्धनाचे काम पूर्ण झाले असून आजपासून श्री जोतिबाच्या मूळ मूर्तीचे दर्शन आता भाविकांना पुन्हा एकदा घेता येणार आहे. संवर्धनानंतर जोतिबाच्या मूर्तीचं दर्शन घेता येणार असल्यामुळे भाविक सुद्धा मोठ्या संख्येने येत आहेत. सकाळी ७ वाजून ५ मिनिटांच्या मुहूर्तावर पुजाऱ्यांचे हस्ते प्राण प्रतिष्ठापणा विधी संपन्न झाला. त्यानंतर सर्वच भाविकांना मूळ मूर्तीचे दर्शन घेता आले.
Previous Articleआत्मदहनाचा इशारा, प्रशासनाची तारांबळ
Next Article शिक्षकच नाहीत, तर विद्यार्थी येणार कोठून ?








