वृत्तसंस्था/ कॅनबेरा
ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्या होणाऱ्या 3 सामन्यांच्या टी-20 मालिकेतून ऑस्ट्रेलियाचा यष्टीरक्षक आणि फलंदाज जोश इंग्लिसला दुखापतीमुळे बाहेर पडावे लागत आहे. आता इंग्लिसच्या जागी अॅलेक्स कॅरेचा संघात समावेश करण्यात आलेला आहे.
ही टी-20 मालिका न्यूझीलंडमध्ये 1 ऑक्टोबरपासून खेळविली जाणार आहे. इंग्लिसच्या उजव्या पायाच्या पिंढरीचा स्नायू दुखावल्याने तो या मालिकेत खेळू शकणार नसल्याचे क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या प्रवक्त्याने सांगितले. गेल्या वर्षी बॉक्सिंग डे दिवशी भारता बरोबर झालेल्या कसोटी सामन्यात इंग्लिसला ही दुखापत झाली होती. त्यानंतर त्याला या दुखापतीने वारंवार त्रासले गेल्याने त्याला आणखी काही मालिका हुकल्या आहेत. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पर्थ येथे 19 ऑक्टोबरपासून वनडे मालिका खेळविली जाणार आहे. या मालिकेवेळी इंग्लिस उपलब्ध राहिल अशी आशा व्यक्त केली जात आहे. इंग्लिस हा ऑस्ट्रेलियन टी-20 संघातील प्रमुख खेळाडू म्हणून ओळखला जातो.
ऑस्ट्रेलियन संघ : मिचेल मार्श (कर्णधार), अॅबॉट, बार्टलेट, अॅलेक्स कॅरे, टीम डेव्हिड, ड्वेरहुईस, हॅझलवूड, हेड, कुहेनमन, मॅक्सवेल, ओवेन, शॉर्ट, स्टोईनिस आणि झंपा.









