वृत्तसंस्था / लंडन
इग्लंडचा डावखुरा वेगवान गोलंदाज जोश हुल याला दुखापत झाल्याने तो पुढील महिन्यात होणाऱ्या पाकच्या दौऱ्यासाठी उपलब्ध होऊ शकणार नाही, अशी माहिती इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळाच्या प्रवक्त्याने दिली.
20 वर्षीय जोश हुलने लंके विरुद्ध खेळविण्यात आलेल्या तिसऱ्या कसोटीत आपले कसोटी पदार्पण केले होते. इंग्लंडचा संघ ऑक्टोबर महिन्यात पाकच्या दौऱ्यावर जाणार असून उभय संघात तीन सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. या मालिकेतील पहिली कसोटी 7 ऑक्टोबरला मुल्तानमध्ये सुरू होईल. इंग्लंडच्या निवड समितीने मात्र अद्याप हुलच्या जागी दुसऱ्या बदली खेळाडूची घोषणा केलेली नाही. 1 ऑक्टोबर रोजी इंग्लंडचा 16 जणांचा संघ पाकला रवाना होणार आहे.









