प्रतिनिधी /म्हापसा
टुगेदर व्ही अचिव्ह फॉर कळंगुटच्या पॅनलखाली जोसेफ सिक्वेरा पाच वर्षाच्या गॅपनंतर पुन्हा एकदा सक्रिय झाले असून यावेळी सिक्वेरा यांनी नवीन चेहऱयांना आपल्या पॅनलमध्ये संधी दिली आहे. सिक्वेरा यांनी आपले पॅनल जाहीर करताना टायगर इज बॅक असे उद्गार येथील उपस्थित कळंगूटवासियांसमोर काढले.
16 कोटीपैकी आज फक्त 3 कोटी राहिले
आपण पंचायतीतून बाहेर पडताना 16 कोटींचे ठेव ठेवली होती मात्र आज पंचायतीमध्ये फक्त तीन कोटी राहिले आहेत. आता हे पैसे कुठे गेले याचा विचार ग्रामस्थांनी करावा. यावेळी आमचे टुगेदर व्ही अचिव्हचे नऊही सदस्य विजयी होणार यात शंकाच नाही. लोकांनी तसा निर्धारही केला आहे, असे त्यांनी सांगितले.
त्यावेळी ओडीपी याचिका रद्द केली
कळंगूट ओडीपी आणली आम्ही उच्च न्यायालयात याविरुद्ध याचिका दाखल केली मात्र त्यावेळी सरपंच अँथनी मिनेझीस यांनी ती रद्द केली. वॉर्ड सदस्य नवीन होते त्यांना काहीच माहिती नव्हते. हे सर्व आपल्या स्वार्थापोटी करण्यात आले. काही पंचानी या ओडीपीत बदल करून 150 एफआयआर केला. आज लोक त्यांना धडा शिकविणार आहे. आमची कामे आमदारांनी अडवून ठेवली यामुळे आम्ही मागे पडलो. कारण कामे केली नाही म्हणून नाही तर एका वॉर्डाचे चार वॉर्ड केले. आज लोक राग काढण्यास तयार आहे. शेतीमध्ये बांधकामास परवानगी देण्यात आली आहे. पोलीस स्थानक ते चर्च रस्ता रुंदीकरण आपण केले मात्र याचे श्रेय आमदार घेऊ पाहत आहेत असे जोसेफ सिक्वेरा म्हणाले.
स्वार्थापोटी फक्त आमदारांनी राजकारण केले
माजी मंत्र्याने आपल्या स्वार्थापोटी अर्बनायझेशन केले. कोविड काळात पैसे लोकांना द्यायला पाहिजे होते मात्र ते झाले नाही. आम्ही मोफत सर्वांना कडधान्य आदी दिले. 1989 पासून आम्ही राजकारणात आहोत. लोबो यांनी कळंगूट विकून काढले. त्यांचे पंचसदस्य अमलीपदार्थाच्या व्यवहारात आहेत, असा आरोपही यावेळी त्यांनी केला.









