चॅम्पियन्स करंडक स्पर्धेतील संघाच्या अपयशानंतर घेतला निर्णय
वृत्तसंस्था/ कराची
इंग्लंड संघाचा कर्णधार जोस बटलरने आपला संघ बाद फेरीत गाठण्यात अपयशी ठरल्यानंतर वनडे व टी-20 संघाचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत इंग्लंड अफगाण संघाकडून पराभूत झाल्यानंतर गट टप्प्यातच ते स्पर्धेतून बाहेर पडले.
इंग्लंडचा शेवटचा गटसाखळी आज शनिवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध येथील नॅशनल स्टेडियमवर होणार आहे. मात्र त्याआधीच त्याने वनडे संघाचे नेतृत्व सोडण्याचा निर्णय शुक्रवारी जाहीर केला. वनडे कर्णधार म्हणून शनिवारचा सामना हा शेवटचा सामना असेल, असे त्याने सांगितले.









