अर्जुन चषक डे-नाईट टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धा : संतोष सुळगे पाटील मालिकावीर

क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
युनियन जिमखाना आयोजित अर्जुन चषक पहिल्या डे-नाईट टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात केआर शेट्टी किंग्स व एवायसी संघांना सुयुक्त विजेतेपद. मालिकावीर संतोष सुळगे पाटील, प्रसाद नाकाडी उत्कृष्ट फलंदाज तर अमानुल्ला उत्कृष्ट गोलंदाज यांना गौरविले.
लव्ह डेल सेंट्रल स्कूलच्या टर्फ मैदानावर खेळविण्यात आलेल्या अर्जुन चषक टेनिसबॉल स्पर्धेत एवायसी व केआर शेट्टी किंग्स यांच्यात अंतिम सामना होणार होता. पण, काही तांत्रिक अडचणींमुळे अंतिम सामना न झाल्यामुळे एवायसी व केआर शेट्टी किंग्स या दोन्ही संघांना संयुक्त विजेते घोषित करण्यात आले.
बक्षीस वितरण प्रसंगी प्रमुख पाहुणे ताहीर सराफ, राहुल नाईक, अनुराग अनगोळकर, महांतेश देसाई, परशराम पाटील, मिलिंद चव्हाण यांच्या हस्ते केआर शेट्टी किंग्स व एवायसी यांना चषक व रोख रक्कम देवून गौरविण्यात आले. स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज प्रसाद नाकाडी, उत्कृष्ट गोलंदाज अमानुल्ला, प्रॉमिसिंग खेळाडू करण बोकडे, मालिकावीर संतोष सुळगे पाटील यांना चषक व रोख रक्कम देवून गौरविण्यात आले.









