प्रतिनिधी /बेळगाव
ख्रिसमसच्या आगमनानिमित्त, युनायटेड ख्रिश्चन फोरम फॉर वूमन राईट्सतर्फे संयुक्त ख्रिसमस कार्यक्रम आयोजित केला होता. रविवारी संध्याकाळी फातिमा पॅथेड्रल पॅम्पसमध्ये सर्व ख्रिस्ती पंथातील लोकांनी एकत्र येऊन हा उत्सव साजरा केला. शहरातील विविध चर्चमधील कॉयर समुहानी ख्रिसमस पॅरोल्स सादर केले. येशूच्या जन्मावर आधारित स्किट्सही सादर केले.
बेळगावचे बिशप रेव्ह. डेरेक फर्नांडिस यांनी नाताळ सणाचा खरा अर्थ सांगितला. रस्त्यावर चालताना वंचित आणि गरीब बालके व नागरिकांची चौकशी करून त्यांना मदत करण्याचे आवाहन त्यांनी केले. येशू ख्रिस्ताचा जन्म गुरे-मेंढ्यांच्या गोठ्यात झाला. तथापि, येशू आज जन्माला आला असता, तर त्याने म्हटले असते की लहानपणी त्याला जे त्रास सहन करावे लागले ते शहरांच्या पदपथांवर सोसणाऱ्या मुलांच्या तुलनेत खूपच कमी होते,” बिशप फर्नांडिस म्हणाले.
इमॅक्मयुलेट कन्सेप्शन चर्च, फातिमा पॅथेड्रल, सेंट अँथनी चर्च, मेथोडिस्ट चर्च, हार्वेस्ट चर्च आणि इतर चर्चमधील गायक मंडळींनी नाताळचा खरा अर्थ सांगणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या जन्माचे चित्रण करणारा प्रभावी कार्यक्रम सादर केला. फोरमचे सहसचिव फा. प्रमोद कुमार, खजिनदार क्लारा फर्नांडिस आणि सदस्य पास्टर नुरुद्दीन, पास्टर चेरियन आणि इतर उपस्थित होते.









