प्रतिनिधी
लांजा
तालुक्यातील खानवली गावचे सरपंच गणपत मांडवकर यांनी धनुष्यबाण हाती घेऊन राजापूर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार किरण उर्फ भैय्या सामंत यांचे नेतृत्व स्वीकारत शिवसेना पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला आहे. त्यांचे यावेळी जोरदार स्वागत करण्यात आले.विधानसभेच्या रणधुमाळीत अनेक पक्षप्रवेश होत असताना खानवली गावाच्या विकासासाठी सरपंच मांडवकर यांनी शिवसेना पक्षाचे धनुष्यबाण हाती घेतले आहे. किरण सामंत यांचे नेतृत्व स्वीकारत गावाच्या विकासासाठी प्रयत्न करणार असल्याचे सरपंच गणपत मांडवकर यांनी सांगितले. धनुष्यबाण हाती घेण्यासाठी उशीर केल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.









