वृत्तसंस्था/ लंडन
इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळाने इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघासाठी माजी क्रिकेटपटू जॉन लेविस यांची प्रमुख प्रशिक्षकपदी नियुक्ती केली आहे. इंग्लंड क्रिकेट मंडळातर्फे ही घोषणा शुक्रवारी करण्यात आली.
इंग्लंडचे माजी क्रिकेटपटू आणि वेगवान गोलंदाज जॉन लेविस हे 2021 पासून ईसीबीचे वेगवान गोलंदाजी प्रशिक्षक पॅनेलमध्ये आहेत. ते इंग्लंडच्या पुरुष संघाला मार्गदर्शन करीत आहेत. लेविस यांनी आपल्या 19 वर्षांच्या व्यावसायिक क्रिकेट कालावधीत सुमारे 1200 गडी बाद केले आहेत. लेविसच्या मार्गदर्शनाखाली इंग्लंडचा नवा संघ 29 नोव्हेंबरला विंडीजच्या दौऱयावर जाणार आहे. या दौऱयामध्ये वनडे आणि टी-20 मालिका होणार आहे.









