नवाजुद्दीन अन् नेहाचा चित्रपट
नवाजुद्दीन सिद्दीकी यावेळी कॉमेडी धाटणीच्या चित्रपटात दिसून येणार आहे. त्याच्या ‘जोगीरा सारा रा रा’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून यातील त्याची नेहा शर्मासोबतची जोडी लोकांना पसंत पडत आहे. या कॉमेडी चित्रपटात ट्विस्ट, रिस्क अन् जुगाड देखील असल्याचे निर्मात्यांकडून म्हटले गेले आहे. या चित्रपटाची कहाण गालिब असद भोपाळी यांची आहे.

या चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकी, संजय मिश्रा, नेहा शर्मा आणि महाक्षय चक्रवर्ती यासारखे कलाकार दिसून येणार आहेत. या चित्रपटात विवाह जुळवून देणारी जोगी ही व्यक्तिरेखा नवाजुद्दीन साकारत आहे. ‘जोगी का जुगाड कभी फेल नहीं होता’ असा एक डायलॉग त्याच्या तोंडून ऐकू येतो. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये नवाजुद्दीन अन् नेहा यांच्यातील केमिस्ट्री प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे.
या चित्रपटाचे दिग्दर्शन कुशन नंदी यांनी केले आहे. हा चित्रपट 12 मे रोजी प्रदर्शित होणार आहे. संजय मिश्रा यांची यातील भूमिकाही अत्यंत मजेशीर आहे. नवाजुद्दीन याचबरोबर आणखी काही चित्रपटांमध्ये दिसून येणार आहे. नवाजुद्दीनने स्वतःच्या अभिनयाच्या बळावर चित्रपटसृष्टीत वेगळी ओळख निर्माण केली आहे.









