वृत्तसंस्था/ लंडन
16 जूनपासून सुरू होणाऱ्या अॅशेस मालिकेसाठी इंग्लंड व वेल्स क्रिकेट मंडळाने संघाची घोषणा केली असून वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर जखमी असल्याने त्याला वगळण्यात आले आहे.
या उन्हाळ्यासाठी आर्चरला अनफिट ठरविल्याने अॅशेस मालिकेतून बाहेर पडल्यामुळे त्याची निराशा वाढली आहे. अलीकडेच करण्यात आलेल्या स्कॅनमध्ये त्याच्या उजव्या हाताच्या कोपराला झालेले स्ट्रेस फ्रॅक्चर पुन्हा चिघळले असल्याचे स्पष्ट झाले. या दुखापतीमुळे त्याला आयपीएलमधूनही बाहेर पडावे लागले. मुंबई इंडियन्स संघाचे तो प्रतिनिधित्व करताना त्याने फक्त पाच सामन्यात भाग घेतला आणि त्यात फक्त 2 बळी त्याला मिळविता आले.









