वृत्तसंस्था / नवी दिल्ली
इजिप्तमधील कैरो येथे झालेल्या विश्व पॅरा पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताचा वयस्कर पॉवरलिफ्टर जॉबी मॅथ्यूने लिजेंड मास्टर्स वयस्करांच्या गटात कांस्यपदक पटकाविले.
जॉबी मॅथ्यूने या गटात दुसऱ्या प्रयत्नात 152 किलो वजन उचलत कांस्यपदक मिळविले. या क्रीडा प्रकारात थायलंडच्या चुमचेईने 162 किलो वजन उचलत सुवर्ण तर पेरुच्या ग्रेसीयाने 161 किलो वजन उचलत रौप्य पदक मिळविले. जॉबी मॅथ्यूचे विश्व पॅरा पॉवरलिफ्टिंग स्पर्धेतील हे दुसरे पदक आहे. यापूर्वी त्याने 2023 साली दुबईत झालेल्या स्पर्धेत कांस्यपदक मिळविले होते.









