जयसिंगपूर- प्रतिनिधी
Rajendra Patil- Yadravkar : कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र महाराष्ट्र शासन,शामराव पाटील यड्रावकर एज्युकेशनल अँड चॅरिटेबल ट्रस्ट,राजेंद्र पाटील यड्रावकर सोशल फाउंडेशन व शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग यड्राव इचलकरंजी यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक २२ जानेवारी २०२३ रोजी शरद इंजीनियरिंग कॉलेज यड्राव इचलकरंजी येथे जवळपास 4 हजार जागांसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन केले असल्याची माहिती आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.नोकरीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी खाजगी आस्थापनेतील या मोठ्या नोकरभरती उपक्रमामध्ये सहभागी होऊन याचा लाभ घ्यावा असे आवहान आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केले.
आर्थिक मंदीमुळे उद्योगांवर संकटे येऊ लागली होती, त्यामुळे याचा मोठा परिणाम रोजगार निर्मितीवर होताना दिसत होता.परंतु सध्या सरकारने उद्योगांना चालना देण्यासाठी उद्योजकांसमोर असलेल्या अडचणी सोडवताना त्यांना मदतीची घेतलेली भूमिका पाहता उद्योग वाढीला मदत होताना दिसत आहे त्यामुळे नव्याने येणाऱ्या या उद्योगांमध्ये व सध्या सुरु असलेल्या उद्योग व्यवसायांमध्ये रोजगार निर्मितीची संधी उपलब्ध होत आहे यामुळे हा रोजगार मेळावा यशस्वी होईल,सातवीपासून पदव्युत्तर आयटीआय,डिप्लोमा,इंजिनीयर एमबीए पर्यंतचे शिक्षण घेतलेल्या उमेदवारांना या रोजगार मेळाव्यामध्ये रोजगाराची संधी मिळणार आहे, बेरोजगार युवकांसाठी हा रोजगार मेळावा रोजगारासाठीची मोठी संधी उपलब्ध करून देणारा असल्याने पात्र उमेदवारांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
खाजगी आस्थापनेतील विविध रिक्त पदांची सविस्तर माहिती मिळण्यासाठी उमेदवारांनी www.mahaswaym.gov.in या वेबसाईटवर जाऊन माहिती घ्यावी,त्याचबरोबर अधिक माहितीसाठी सकाळी साडेनऊ ते सायंकाळी साडेचार या वेळेत शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे संपर्क साधावा त्याचबरोबर सहाय्यक आयुक्त कोल्हापूर यांचे कार्यालय दूरध्वनी क्रमांक ०२३१-२५४५७७ तसेच ९३७०७४९०९१ ८३९०५७८८७५ या मोबाईल नंबर वर संपर्क साधून माहिती घ्यावी असेही आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी यावेळी सांगितले,शिरोळ तालुका आणि परिसरातील बेरोजगार युवकांसाठी आयोजित केलेला हा रोजगार मेळावा अनेकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देणारा ठरेल असेही आमदार यड्रावकर यांनी शेवटी सांगितले यावेळी शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर अनिल बागणे उपस्थित होते.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी









