ऑनलाईन टीम/तरुण भारत
जवाहरलाल नेहरू विद्यापीठात ( jawaharlal nehru university) अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP) आणि डावी आघाडी ऑल इंडिया स्टुडंट असोसिएशन आणि स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (AISF) यांच्या सदस्यांमध्ये हाणामारी झाली. रविवारी हिवाळी अधिवेशनासाठी नोंदणीवरून ही हाणामारी झाल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितलं आहे. हाणामारीत अनेक विद्यार्थी जखमी झाले आहेत तर काही जण गंभीर जखमी आहेत. गंभीर जखमी विद्यार्थ्यांवर नवी दिल्लीतील एम्समध्ये उपचार सुरू आहेत. या घटनेची औपचारिक तक्रार दिल्ली पोलिसांकडे करण्यात आली आहे, असे विद्यार्थी संघटनेच्या सदस्यांनी सांगितले.
रविवारी रात्री दहाच्या सुमारास विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेच्या कार्यालयात ही घटना घडल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. दोन्ही संघटनांचे सदस्य एकमेकांवर हल्ला केल्याचा आरोप करत आहेत. जेएनयूमध्ये वारंवार विद्यार्थी संघटनेमध्ये वाद होत असतो. यापूर्वी ६ जानेवारी २०२० रोजी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विद्यार्थ्यांनी या हल्ल्यासाठी डाव्या संघटनांना जबाबदार धरले होते.
जेएनयूमध्ये शिकणारे काही अभाविपचे सदस्य माध्यमांसमोर आले होते. त्यांनी डाव्या संघटनांवर हल्ल्याचा आरोप केला एबीव्हीपीच्या सदस्यांनी केला आहे. हिवाळी अधिवेशनासाठी नोंदणीवरून ही हाणामारी झाल्याचे विद्यार्थ्याने सांगितले. विद्यार्थ्याच्या म्हणण्यानुसार, ७०० लोक (डाव्या संघटनांचे) शांती मोर्चासाठी जमले होते आणि त्यांनीच सर्व्हर रूमचे नुकसान केले जेणेकरून नोंदणी विस्कळीत होईल, असा आरोप केला आहे.
तर या घटनेनंतर स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय) च्या नेत्या आणि जेएनयू स्टुडंट्स युनियनच्या अध्यक्षा आयेशी घोषने ट्विट करत याबाबत माहिती दिली. ‘एबीव्हीपीच्या गुंडांनी आज जेएनयूमध्ये हिंसाचार पसरवला. या गुन्हेगारांनी वेळोवेळी विद्यार्थ्यांवर हिंसाचार करून कॅम्पसमधील लोकशाही विस्कळीत केली आहे. तरीही जेएनयू प्रशासन गप्प राहणार का? गुंडांवर कारवाई होणार नाही का?’ असे आयेशी घोषने म्हटले आहे. यासोबतच हल्ल्यात जखमी झालेल्या विद्यार्थ्यांचे फोटोही शेअर केले आहेत.