प्रतिनिधी /म्हापसा
ज्ञानप्रसारक मंडळाचे महाविद्यालय आज केवळ पायाभूत सुविधांमुळेच नवेह तर त्याच्या निष्ठावंत कर्मचाऱयांमुळेच उंच उभे आहे असे मंडळाचे अध्यक्ष श्रीकृष्ण पोकळे यांनी शिवाजी बी. धारवाडकर आणि प्रा. एम.आर. पाटील यांच्या विदाई सहसत्कार समारंभात प्रमुख पाहुणे या नात्याने सांगितले. ज्ञानप्रसारक मंडळाच्या कर्मचारी कल्याण समिती या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
अध्यक्ष श्रीकृष्ण पोकळे यांनी प्रा. एम.आर. पाटील यांचा साधेपणा, लालित्य आणि विनम्र स्वभाव आणि शिवाजी धारवाडकर यांचा समर्पण व निष्ठावंत स्वभाव यावर प्रकाश टाकला. त्यांनी ज्ञानप्रसारक मंडळाच्या महाविद्यालय आणि संशोधन केंद्रातील त्यांच्या योगदानाबद्दल तसेच त्यांच्या कामगिरीबद्दल सांगितले. अध्यक्षांनी आपल्या अभिभाषणात सांगितले की, या सत्कारमूर्तीचा संस्थेच्या वाढीमध्ये अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. प्रा. डी.बी. आरोलकर यांनी दोन्ही सत्कारमूर्तींच्या कार्याचे कौतुक करून त्यांच्यासोबतच्या प्रासाच्या आठवणी सांगितल्या. त्यांनी श्री. धारवाडकर यांच्या एनसीसीमधील योगदानाचे कौतुक केले आणि केवळ डीएम्स महाविद्यालयातच नव्हे तर गोव्यातही संशोधन कार्यात सहभागी झाल्याबद्दल प्रा. एम.आर पाटील यांचे कौतुक केले. ते पुढे म्हणाले की, प्रा. एम.आर पाटील हे डीएमच्या महाविद्यालयात संशोधनाचे बीज रुजवण्यात कारणीभूत आहेत.
सत्काराला उत्तर देताना शिवाजी धारवाडकर यांनी आपल्या सर्व भूतकाळातील, विद्यमान अध्यक्ष, व्यवस्थापन सदस्य, प्राचार्य शिक्षक व शिक्षकेतर सहकाऱयांचे आभार मानले. त्यांनी संस्थेच्या हितासाठी प्रामाणिकपणे काम केले आहे आणि परिणामी त्याचा स्वतःला मोठा फायदा झाल्याचे सांगितले. प्रा. एम.आर पाटील यांनीही सर्वांचे आभार मानले. त्यांनी संपूर्ण मेळाव्याला स्मृतीमार्गावर नेले आणि आज जे आहे ते बनण्यासाठी संस्थेने त्यांना कशी मदत केली आहे हे विषद केले. शिकण्याची अध्यापनाची आणि संसोधनाची आवड यामुळेच त्यांचे जीवन परिपूर्ण झाले आहे आणि पुढील आयुष्य अधिक संशोधनासाठी समर्पित करण्याचा त्यांचा विचार असल्याचे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी साहाय्यक संचालक कौस्तुभ कामत यांनी प्रा. एम.आर पाटील आणि शिवाजी धारवाडकर यांचा गौवा सरकारच्या उच्च शिक्षण संचालनालयाच्या वतीने प्रशस्तीपत्र, प्रमाणपत्र, पेंशन ऑर्डर आणि मानचिन्ह देऊन सत्कार केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांती तळपणकर व प्रसाद कळंगुटकर यांनी तर उपप्राचार्या रश्मी राजेंद्र रेडकर यांनी आभार मानले.









