रौनक खन्नुकर, आदित्य बिडीकर यांना सामनावीर पुरस्कार : राजू दोड्डण्णवर क्रिकेट स्पर्धा
बेळगाव : आनंद क्रिकेट अकादमी आयोजित राजू दोड्डण्णवर चषक लिटल चॅम्प 12 वर्षांखालील आंतरक्लब क्रिकेट स्पर्धेत एमसीसी ब्लास्टरने लेकव्हूय टायटन्सवर सुपर ओव्हरमध्ये तर जीवनित्र वॉरियर्स संघाने एमसीसी ब्लास्टरचा पराभव करुन प्रत्येकी दोन गुण मिळविले. रौनक खन्नुकर, आदित्य बिडीकर यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला. पहिल्या सामन्यात लेकव्ह्यु टायटन्सने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 5 गडी बाद 127 धावा जमविल्या यामध्ये अरिहंत राजमानेने 1 षटकार 3 चौकारासह नाबाद 32, श्रेयश पाटीलने 3 चौकारासह 29 धावा जमविल्या, तर एनसीसीतर्फे आदित्य बिडीकरने 3 गडी बाद केले.
प्रत्युत्तरादाखल करत खेळताना एमसीसीने 20 षटकात 9 गडी बाद 127 धावा जमविल्या तर विश्रुत कुंदरनाडने 1 षटकार 6 चौकारासह 58, अराध्य तुडयेकरने 1 षटकार 2 चौकारासह 27 धावा जमविल्या तर लेकव्ह्युतर्फे खेळताना आयुष, चैतन्य व श्रेयश यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केल्या,त्यानंतर झालेल्या सुपर ओव्हरमध्ये एमसीसीने लेकव्ह्युला पराभवचा धक्का दिला. दुसऱ्या सामन्यात जीवनेत्रा प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 4 गडी बाद 119 धावा जमविल्या. यामध्ये अथर्व खन्नुकरने 5 चौकारासह 39, अरुष पाटीलने 2 चौकारासह 17 तर स्वराज्य गोवेकरने 2 चौकारासह नाबाद 15 धावाची जमविल्या. एमसीसीतर्फे समर्थने 1 गडी बाद केला.तर प्रत्युत्तरादाखल खेळताना एमसीसी ब्लास्टरचा डाव 15.1 षटकात 66 धावांत आटोपला. अराध्य तुडयेकरने 20, आयुष हुगारने 18 धावा केल्या.









