आनंद करडी सामनावीर, अक्षय पाटीलला मालिकावीर
बेळगाव : हुबळी येथे जितो हुबळी चॅप्टर आयोजित के. के. जी. झोन राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात जितो बेलगाम पँथर संघाने जीएसपीएल बेंगळूर संघाचा 11 धावांनी पराभव करुन जितो हुबळी चषक पटकाविला. आनंद करडी यांना सामनावीर तर अक्षय पाटीलला मालिकावीर पुरस्काराने गौरविण्यात आले. हुबळी येथे आयोजित करण्यात आलेल्या या राज्य स्तरीय क्रिकेट स्पर्धेत अंतिम सामन्यात जितो-बेळगाव पँथर संघाने प्रथम फलंदाजी करताना 10 षटकात 7 गडी बाद 88 धावा केल्या. आनंद करडी 28, प्रवीण शेरीने 22 धावा केल्या. बेंगळूरतर्फे दीक्षित सुवर्णा 2, आयुष कोठारी यांनी 2 गडी बाद केले.
प्रत्युत्तरादाखल खेळताना जेएसपीएल बेंगळूर संघाने 10 षटकात 7 गडी बाद 77 धावा केल्या. निशांत कोठारीने 29, आयुष कोठारीने 15 धावा केल्या. बेळगाव पँथरतर्फे अक्षय पत्रावळी, विशाल व आर्यनने प्रत्येकी 1 गडी बाद केला. सामन्यानंतर मान्यवरांच्या हस्ते विजेत्या जितो बेलगाम पँथर व उपविजेत्या जेएसपीएल बेंगळूर संघाला आकर्षक चषक, रोख रक्कम देवून गौरविण्यात आले. अंतिम सामन्यातील सामनावीर आनंद करडी, उत्कृष्ट फलंदाज व मालिकावीर अक्षय पाटील यांना चषक देवून गौरविण्यात आले. या संघात विशाल गौरगोंडा, आनंद करडी, देवेंद्र कुडची, महावीर संगोडी, प्रवीण शेरी, पवन उपाध्येय, अक्षय पत्रावळी, आर्यन उपाध्येय, अक्षय पाटील, विजय पाटील, अभिषेक मिर्जी, स्वयंम अप्पण्णावर, अजिंक्य शिरगुप्पी तर व्यवस्थापक म्हणून सचिन पाटील यांनी काम पाहिले.









