वृत्तसंस्था/ चेन्नई
मध्यफळीत खेळणारा फुटबॉलपटू यमखाईबम जितेश्वर सिंगच्या करारात इंडियन सुपर लिग फुटबॉल स्पर्धेतील माजी विजेता संघ चेन्नईन एफसीने 2025 पर्यंत वाढ केली आहे.
2024 च्या झालेल्या इंडियन सुपर लिग फुटबॉल हंगामात जितेश्वर सिंगची कामगिरी दर्जेदार झाल्याने चेन्नईन एफसी संघाने त्याच्या करारात वाढ केली असून हा करार 2025 अखरेपर्यंत राहिल. मणिपूरच्या 22 वर्षीय जितेश्वर सिंगने 2022 साली इंडियन सुपर लिग फुटबॉल स्पर्धेत आपले पर्दापण चेन्नईन एफसी संघाकडून केले होते. जितेश्वर सिंगने चेन्नईन संघाकडून विविध फुटबॉल स्पर्धांमध्ये 44 सामने खेळले आहेत. गेल्या वर्षी झालेल्या एएफसीच्या 23 वर्षाखालील वयोगटाच्या आशिया चषक पात्रता फुटबॉल स्पर्धेत जितेश्वर सिंगचा भारतीय संघात समावेश होता.









