वृत्तसंस्था /मुंबई
जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस लिमिटेडच्या समभागामध्ये गुरुवारी सलग चौथ्या दिवशी लोअर सर्किट लागल्याचे दिसून आले आहे. कंपनीचा समभाग हा गुरुवारी 5 टक्क्यांनी घसरुन तो 213.45 रुपयांवर आला. कंपनीचा समभाग गुरुवारी 5 टक्के घसरून 213.45 रुपयांवर आला. जेएफएसचा समभाग 21 ऑगस्ट रोजी सुचिबद्ध झाला, तेव्हापासून कंपनीचा समभाग 5 टक्क्यांच्या लोअर सर्किटमध्ये आहे. गेल्या चार दिवसांत कंपनीच्या शेअरमध्ये आतापर्यंत सुमारे 20 टक्के घसरण झाली आहे. यामुळे कंपनीचे बाजारमूल्य हे सुमारे 30,000 कोटी रुपयांनी कमी झाले आहे. बीएसईच्या माहितीनुसार, जेएफएस समभाग पुढील तीन दिवस एस अॅण्ड पी बीएसई निर्देशांकाच्या बाहेर राहणार नाही कारण तो सलग चौथ्या दिवशी 5 टक्क्यांच्या लोअर सर्किटमध्ये आहे.
बाजारमूल्य चार दिवसांत 30,000 कोटींनी कमी
जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेसच्या शेअरमध्ये सातत्याने घट होत असल्याने त्याचे बाजारमूल्यही सातत्याने घसरत आहे. आज कंपनीच्या मार्केट कॅपमध्ये 7,115.68 कोटी रुपयांची घट झाली आहे. त्याच वेळी, गेल्या 3 दिवसांत कंपनीचे मार्केट कॅप 23,000 कोटी रुपयांहून अधिक घसरले आहे. त्यानुसार चार दिवसांत कंपनीच्या मार्केट कॅपमध्ये 30,000 कोटी रुपयांहून अधिक घट झाली आहे. यामुळे आता कंपनीचे मूल्य 1.36 लाख कोटी रुपयांवर आले आहे.









