वृत्तसंस्था /मुंबई
भारतातील अब्जाधीश उद्योगपती मुकेश अंबानी यांची वित्तीय सेवा कंपनी जिओ फायनान्शिअल सर्व्हिस (जेएफएस) गुरुवारी रिलायन्स इंडस्ट्रीजमधून बाहेर पडली आहे. डिमर्जरपूर्वी, स्टॉक एक्सचेंज राष्ट्रीय शेअर बाजारात प्री ओपन सत्र देखील आयोजित केले होते. यामध्ये शेअर बाजारात डिमर्ज झालेल्या जिओ फायनान्शिअल सर्व्हिस कंपनीच्या शेअरच्या किमतीने विश्लेषकांच्या अपेक्षेपेक्षा जादा उसळी घेतली. जेएफसीच्या शेअरची किंमत 261.85 रुपये निश्चित केल्यानंतर त्यांची किंमत अंदाजे 20 अब्ज डॉलर्स एवढी राहिली असल्याची माहिती रॉयटर्सने दिली आहे. डिमर्जर, ज्याची गेल्या ऑक्टोबरमध्ये घोषणा करण्यात आली होती, रिलायन्सला किफायतशीर वित्तीय सेवा क्षेत्रात विस्तार करण्याचा एक मार्ग म्हणून पाहिले जाते. विशेषत: त्याच्याकडे आधीपासूनच बिगर बँक वित्तीय कंपनी परवाना आहे.
मागील वर्षी डिमर्जरची घोषणा
कंपनीने गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये डिमर्जरची घोषणा केली होती. तेलापासून ते किरकोळ व्यवसायांपर्यंत विस्तारलेल्या कंपनीकडे आधीच नॉन-बँकिंग फायनान्ससाठी परवाना असल्याने कंपनीने आपला आर्थिक व्यवसाय वाढवण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे मानले जात आहे. आजच्या विशेष सत्राच्या शेवटी, जेएफएसच्या समभागाची किंमत 261.85 रुपये निश्चित करण्यात आली.
पुढील 2 ते 3 महिन्यात होणार लिस्ट
जियो फायनान्शीयल सध्या प्रमुख निर्देशांकात सध्याला सामील झाला आहे पण लिस्टिंगपर्यंत या समभागात ट्रेडिंग होणार नसल्याची माहिती आहे. पुढील 2 ते 3 महिन्यात हा समभाग लिस्ट होऊ शकतो, असे सांगितले जात आहे. डिमर्जरनंतर जियो फायनान्शीयल ही स्वतंत्र कंपनी असेल. ज्याचे सीईओ व एमडी हितेश कुमार असतील.









