नवी दिल्ली :
रिलायन्स जिओ 31 जुलै रोजी आपला नवीन जिओ बुक लॅपटॉप भारतात लाँच करणार आहे. ई-कॉमर्स वेबसाइट अॅमेझॉनने जिओ बुक लाँच करण्याची तारीख आणि माहिती दिली आहे. मात्र, कंपनीने याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.
टीझरनुसार, जिओ बुक उत्पादकता, मनोरंजन आणि गेमिंगसाठी डिझाइन केले आहे. लॅपटॉपला 4 जी कनेक्टिव्हिटी मिळेल आणि परफॉर्मन्ससाठी ऑक्टा-कोअर प्रोसेसर दिला जाईल, ज्याच्या मदतीने वापरकर्ते हाय-डेफिनिशन व्हिडिओ स्ट्रीमिंग, मल्टीटास्किंग करू शकणार असल्याची माहिती दिली आहे.
जिओबुक 990 ग्रॅम वजनासह कॉम्पॅक्ट आकारात
जिओ बुक लॅपटॉप कॉम्पॅक्ट आकारात येणार असून 990 ग्रॅम वजनाचा असेल, असे टीझरमध्ये दिसून आले आहे. त्याचवेळी, डिझाइनबद्दल बोलायचे तर, कंपनीने ऑक्टोबर 2022 मध्ये लॉन्च केलेल्या लॅपटॉपसारखेच डिझाइन त्यात देखील पाहिले जाऊ शकते. कंपनी आगामी जिओबुक 20,000 रुपयांमध्ये लॉन्च करू शकते. याआधी कंपनीने 15,000 रुपयांमध्ये फर्स्ट जनरेशन जिओबुक लॉन्च केले होते.
डिस्प्ले: 11.6-इंचाच्या एचडी डिस्प्लेसह येतो. डिस्प्लेच्या चारही बाजूंना रुंद बेझल्स आढळतात, ज्यामध्ये व्हिडिओ कॉलिंगसाठी 2 एमपी कॅमेरा आहे.
हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर: जिओबुक 2022 लॅपटॉप 2जीबीरॅमसह32 जीबी अंतर्गत स्टोरेजसह येतो, जो 128 जीबीपर्यंत वाढवता येतो.
बॅटरी: पॉवर बॅकअपसाठी लॅपटॉपमध्ये 5000 एमएएच क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे.









