इचलकरंजी,प्रतिनिधी
Ichalkaranji Sport News : अ. लाट (ता. शिरोळ ) येथील मोटर स्पोर्ट राईडर मास्टर जिनेंद्र किरण सांगावे यांनी वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी नॅशनल चॅम्पिअन किताब मिळवला. चेन्नई येथे झालेल्या एम. आर. एफ. नॅशनल सुपरक्रास चॅम्पिअनशिप २०२२ आयोजित स्पर्धेत हा पुरस्कार त्याला बहाल करण्यात आला. मास्टर जिनेंद्र सांगावे हा किताब मिळविनारा भारतातील एस एक्स 2 मोटर स्पोर्ट मध्ये ऐतिहासिक विजेता आणि सर्वात वयाने लहान खेळाडू ठरला आहे.
फेडरेशन् ऑफ मोटर स्पोर्ट इंडिया आणि एम.आर.एफ. टायर कंपनी यांच्या वतीने एम. आर. एफ. नॅशनल सुपरक्रास चॅम्पिअनशिप २०२२ स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धे मधील मोठया गटातील दुसऱ्या क्रमांकच्या सर्व श्रेष्ट मानल्या जाणाऱ्या एस एक्स 2 (500ccओपन) स्पर्धेत तो सहभागी झाला होता. या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केल्या बद्दल चेन्नाई येथे आलिशान कार्यक्रम आयोजीत करून नॅशनल चॅम्पिअन किताब बहाल करण्यात आला.या कार्यक्रमासाठी एफ एम एस सी आय चे प्रेसिडेंट अकबर इब्राहिम आणि एफ आय एम चे प्रेसिडेंट सुजित कुमार यांच्या हस्ते बक्षीस वितरण संपन्न झाला.
मोटोक्रास खेळ अतिशय धाडशी खेळा मधील एक खेळ मानला जातो.वेगवान आणी ताकतवर इंपोर्टेड बाईक हाताळण्या साठी जिद्द, चिकाटी आणि निडर असणे खूप महत्वाचे असते.प्रचंड मेहनत, सराव व अचूक बाईक कंट्रोल असणे गरजेचे असते. मास्टर जिनेंद्र ने लहानपणा पासूनच वयाच्या ४ थ्या वर्षा पासून बाईक चालवण्याची तयारी करित वयाच्या ७ व्या वर्षी पासून नँशनल व इतर स्पर्धे भाग घेत आज पर्यंत ३ चॅम्पिअन किताब सह १२५ पेक्षा जास्त पदक पटकविले आहेत.
जिनेंद्रला या खेळासाठी वेगा हेल्मेंटस् बेळगावी, टी. व्ही.एस. रेसिंग टीम, मोहिते रेसिन्ग अकदमी कोल्हापुर, आवाडे मोटोर स्पोर्ट इचलकरंजी, अरुआनीं ग्रीड बेंगलूरू या सह कोल्हापुर आणि इचलकरंजी व पुणे येथिल सर्व रायडर व मेकनिक, न्यू इंग्लिश स्कूल लॉटन्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज लाट. या सर्वांचे सहकार्य मिळत आहे. नॅशनल चॅम्पियनशिप चा किताब जिनेन्द्रच्या मोटर्स स्पोर्ट्स करिअरमधील एक महत्त्वाचा टप्पा आहे असे जिनेंद्र चे काका सागर सांगावे यांनी सांगितले.
Previous Articleमंत्री दीपक केसरकरांची कै .सुधाताई कामत शाळेला भेट !
Next Article बेंगळूरचा दिल्लीवर 23 धावांनी विजय









