मुंबई
जिंदाल स्टील अँड पॉवर (जेएसपीएल) यांच्या समभागाने बुधवारी शेअरबाजारात नवी झळाळी प्राप्त करण्यात यश मिळवले आहे. समभागाने 10 वर्षानंतर नवी विक्रमी झेप घेतली आहे. बुधवारी जिंदाल स्टील व पॉवरचा समभाग इंट्रा डे दरम्यान 2 टक्के वाढत 610 रुपयांवर पोहचला होता. याआधी मार्च 2012 मध्ये या समभागाच्या भावाने उच्चांकी झेप घेतली होती. गेल्या 6 महिन्याच्या कालावधीत कंपनीचा समभाग 74 टक्के इतका वाढला आहे.









