सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित
जिमी शेरगिल मागील काही काळापासून स्वत:ची वेबसीरिज ‘चूना’वरून चर्चेत आहे. या सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. यात जिमी विनोदी धाटणीची भूमिका साकारत आहे. या सीरिजचे दिग्दर्शन पुष्पेंद्र नाथ मिश्रा यांनी केले असून त्यांनीच याची कथा लिहिली आहे.

कॉमेडी-ड्रामा वेबसीरिज ‘चूना’ ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. यात एक ज्योतिषी, हेर, गावगुंड, पोलीस अधिकारी, यशस्वी कंत्राटदार अन् सर्वसामान्य व्यक्ती हे सर्व मिळून जीत शुक्ला या पात्राला हरविण्यासाठी दरोड्याची योजना आखत असल्याचे ट्रेलरमध्ये दाखविण्यात आले आहे. जीत शुक्ला हे पात्र जिमी शेरगिलने साकारले आहे.
या सीरिजचा प्रीमियर 3 ऑगस्ट रोजी नेटफ्लिक्सवर होणार आहे. या सीरिजमध्ये जिमी शेरगिलसोबत अतुल श्रीवास्तव, विक्रम कोचर, चंदन रॉय, ज्ञानेंद्र त्रिपाठी, मोनिका पवार, नमित दास, आशिम गुलाटी, निहारिका लायरा दत्ता यासारखे कलाकार दिसून येणार आहेत.









