सावंतवाडी । प्रतिनिधी
तालुक्यातील कलंबिस्त (गणशेळवाडी) येथील रहिवासी श्री रामा उर्फ. जिजबा गोपाळ सावंत ( 105 )वर्ष यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.पंचक्रोशीत वयाचे शतक पूर्ण करणारे जिजबा हे पहिले होते . शेती व पशुपालन व्यवसाय हे त्यांच्या उदरनिर्वाहाचे साधन होते. गावच्या अध्यात्मिक ,सामाजिक उपक्रमात ते नेहमी हिरिरीने भाग घेत .शेती व म्हैस पालन व्यवसायात ते पारंगत होते. त्यांना शेतीचा गाडा अभ्यास होता. शेतीमध्ये त्यांनी पारंपारिक शेतीवर भर देत वयाच्या नव्वदीपर्यंत शेती व्यवसायात स्वतःला वाहून घेतले.त्यांच्या जाण्याने एका जाणकार व्यक्तीला आम्ही मुकलो अशा शब्दात अनेकांनी श्रद्धांजली वाहिली. पश्चात पत्नी ,विवाहित मुलगी, मुली, सुना ,नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे.









