► प्रतिनिधी/ बेळगाव
जिजामाता बँकेतर्फे मुजावर गल्ली येथील बँकेच्या शाखेमध्ये राजमाता जिजाऊ जयंती व स्वामी विवेकानंद जयंती साजरी करण्यात आली. जिजाऊ जयंतीचे औचित्य साधून सभासद, खातेदार, ठेवीदार, ग्राहक यांच्यासाठी ‘राजमाता जिजाऊ ठेव योजना’ जाहीर करण्यात आली. ही योजना बचत 100 च्या पटीत 5, 7, 9, 10 वर्षांकरिता लहान मुला-मुलींच्या बचतीसाठी आहे, असे यावेळी सांगण्यात आले.
याप्रसंगी व्हा. चेअरपर्सन जयश्री वीरसिंह भोसले व संचालिका भाविका होनगेकर, साक्षी चोळेकर, लीला पाटील, भारती किल्लेकर, लता खांडेकर, शशिकला काकतकर, मंगला नाईक, श्वेता घाटके व व्यवस्थापक नितीन आनंदाचे उपस्थित होते.









