भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग यांच्यावर एका अल्पवयीन महिला कुस्तीपटूंसह सात महिला कुस्तीपटूंनी लैंगिक छळाचे आरोप केले आहेत. याबाबत कुस्तीपटूंनी न्यायलयात धाव घेतली असून आंदोलनही सुरु आहे. मात्र दुसरीकडे कोल्हापुरात दिपाली भोसले-सय्यद आयोजीत प्रथम महिला केसरी स्पर्धेचे आयोजन केले आहे. याचे पोस्टर शहरात ठिक-ठिकाणी लावण्यात आले आहेत. यामध्ये ब्रिजभूषण सिंग यांचे विशेष आभार मानण्यात आले आहेत. एवढचं नाही तर महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेला ते प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती लावणार आहेत. यावरून कोल्हापुरात विविध चर्चेला उधानं आलं आहे. दरम्यान, यावरून जिजाऊ ब्रिगेड संघटना आक्रमक झाली असून, आंदोलनाच्या तयारीत आहे.
महाराष्ट्र केसरी स्पर्धा पार पडल्यानंतर महिला कुस्ती स्पर्धा आयोजनाची घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या बैठकीत 22 आणि 23 मार्चला कुस्ती स्पर्धा घेण्याचे निश्चित झाले असल्याची माहिती महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे सचिव बाळासाहेब लांडगे यांनी केली होती.मात्र, महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धा अस्थायी समितीने पुण्यात घेण्याचे निश्चित केल्याने महाराष्ट्र कुस्ती संघातील वाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे.
दरम्यान,दीपाली सय्यद यांनी कोल्हापुरात होणारी महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धा ही राज्य सरकारची अधिकृत स्पर्धा असल्याचा दावा केल्यानंतर नवा वाद निर्माण झाला होता. मात्र ही स्पर्धा कोल्हापुरात 25, 26, 27 एप्रिलला भरवली. या स्पर्धसाठी सय्यद यांनी प्रमुख अतिथी ब्रिजभूषण सिंग यांना आमंत्रित केले आहे. ब्रिजभूषण सिंग यांच्यावरील लैंगिक छळाचे आरोपावरून दिल्लीत आंदोलन सुरु असतानाच कोल्हापुरातील स्पर्धेला ते हजेरी लावणार आहेत यावरून आता कोल्हापुरात ब्रिगेड संघटना आक्रमक झाली असून, आंदोलनाच्या तयारीत आहे.
Previous Articleभारती विद्यापीठाने नवीन शैक्षणिक धोरणानुसार शिक्षण द्यावे
Next Article कोंढवा परिसरात भररस्त्यात चाकूने भोसकून तरुणाचा खून









